Abhijeet Dipke: अभिजित दीपके यांना टायफॉईडची लागण; आंदोलकांना दिला महत्त्वाचा संदेश VIDEO

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना टायफॉईडची लागण झाली आहे.
Abhijeet Dipke
Abhijeet DipkeFile Photo
Published on
Updated on

Abhijeet Dipke

नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना टायफॉईडची लागण झाली आहे. एक व्हिडिओ पोस्ट करत दीपके यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून दिपके यांची तब्बेत खराब आहे. मात्र, प्रकृती खालावलेली असली तरीही उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दीपके यांनी सांगितले की, "गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नव्हती. रक्ताच्या चाचणी अहवालानुसार मला टायफॉईडचे निदान झाले असून दररोज सकाळी आणि संध्याकाळी सलाईनद्वारे उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यानंतरही देशभरात अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या माझ्या सर्व समर्थकांमुळेच हे आंदोलन इतके यशस्वी झाले आहे. याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो."

Abhijeet Dipke
Sonam Wangchuk Message: केंद्रीय मंत्र्यांच्याच हस्ते उपोषण का सोडलं; काय डील झालं... सोनम वांगचुक यांनी नेमकं काय सांगितलं?

आंदोलनात १३० पोलीस आणि ६५ विद्यार्थी जखमी; ३००० पोलीस कर्मचारी तैनात

या आंदोलनात आतापर्यंत १३० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच, सुमारे ६५ विद्यार्थीही जखमी झाले आहेत. जंतर-मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सुमारे १०,००० लोक उपस्थित आहेत आणि तिथे ३००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

'फेशियल रेकग्निशन सिस्टम' कॅमेऱ्यांच्या मदतीने, दिल्ली पोलीस जंतर-मंतरवर येणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवत आहेत. आतापर्यंत अशा २००० हून अधिक लोकांची ओळख पटली आहे ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि जे जंतर-मंतरवर आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी 'एएनआय' ला दिली आहे.

महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक

महाराष्ट्र TET पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ता याला, अनेक महिने फरार राहिल्यानंतर, ठाणे पोलिसांनी शनिवारी सकाळी बिहारमधून अटक केली. या प्रकरणात विशेष तपास पथकाने यापूर्वीच त्याची पत्नी सुमन गुप्ता हिला अटक केली होती. सुमन गुप्ता हिने या रॅकेटमधून मिळालेल्या पैशांचे व्यवस्थापन केले होते आणि त्याला अटकेपासून वाचण्यास मदत केली होती, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.

Abhijeet Dipke
Mohan Bhagwat: नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद साधा; मोहन भागवत यांचे मोठे विधान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news