दिल्लीतील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी संचालकांना पोलीस कोठडी

दिल्लीतील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी संचालकांना पोलीस कोठडी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- दिल्लीतील बेबी केअर सेंटरला शनिवारी (दि.२५ मे) रोजी आग लागून ७ नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत अटकेत असलेल्या २ संचालकांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणातील आरोपी संचालक डॉ. नवीन खिची, डॉ. आकाश यांना करकरडूमा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर न्यायालयाने दोघांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या बेबी केअर सेंटरला पाच खाटांचाच परवाना होता. मात्र, तरीही नियमांचे उल्लंघन करून त्यांनी १२ नवजात बालके रुग्णालयात दाखल होती. यासोबतच परवान्याची मुदतही संपली होती, दरम्यान अटकेतील दोन्ही संचालकांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर न्यायलयाने त्यांची तीन दिवसांसाठी कोठडीत रवानगी केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news