छ. संभाजीनगर : पैठणमध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास | पुढारी

छ. संभाजीनगर : पैठणमध्ये वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास

पैठण; पुढारी वृत्तसेवा : दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून १ लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. पैठण शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी (दि.१५) ही घटना घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील पितांबरी मंगल कार्यालयाच्या परिसरात अनुसया प्रभाकर अपरंपार ( रा. पोस्ट ऑफिस जवळ पैठण) या महिलेच्या गळ्यातील २८ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र  दोघां चोरट्यांनी हिसकावून नेले. तसेच शहराबाहेरील सह्याद्री चौकातून सुवर्णा कैलास पठाडे (रा. नारळा पैठण) ही महिला जात असताना मोटरसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७२ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र  तोडून पाबोरा केला. या दोन्ही घटनांबाबत पैठण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास सपोनि प्रल्हाद मुंडे हे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button