जळगाव : अखेर फरार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंनी पत्करली शरणागती | पुढारी

जळगाव : अखेर फरार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंनी पत्करली शरणागती

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व निलंबित पोलीस अधिकारी किरणकुमार बकाले दीड वर्षानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले आहेत. गेल्या दीड वर्षापासून त्यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला व जळगाव पोलिसांना चकवा देत होते. शेवटी त्यांनी स्वतःहून शरणागती पत्करली आहे.

संबंधित बातम्या 

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.  ते वक्तव्य मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याची दखल घेऊन मराठा समाजाने मोठे आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. दरम्यान, जिल्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून प्रयत्न करीत होते. मात्र, त्यांना त्यामध्ये यश आले नाही. स्वत: वरील अडचणी लक्षात घेऊन त्यांनी १५ जानेवारीरोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शरण आले.

मराठा समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांना नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून त्यांचा पोलीस शोध घेत होते. मात्र, ते मिळत नव्हते.  अखेर त्यांनी स्वतःहून १५ जानेवारीला शरणागती पत्करली.

Back to top button