छत्रपती संभाजीनगर-बुलढाणा मार्गावर ८२ लाखांचा गांजा जप्त; एलसीबीची कारवाई | पुढारी

छत्रपती संभाजीनगर-बुलढाणा मार्गावर ८२ लाखांचा गांजा जप्त; एलसीबीची कारवाई

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरकडून बुलढाणा शहराकडे येत असलेल्या एका संशयित ट्रकला अडवून बुलढाणा एलसीबीच्या पथकाने ट्रकमधील सुमारे ८१ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा तब्बल ४ क्विंटल ५९ किलो ४०० ग्रॅम अवैध गांजा, २२ लाखाचा ट्रक व दोन मोबाईल असा १ कोटी १४ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी वाहनचालक राहुल गोटीराम साबळे (वय २७, रा.कु-हा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) याला अटक केली आहे. आज (दि.९) पहाटे ३ वा.च्या सुमारास धाड गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.

भोकरदन मार्गाने एका ट्रकमधून अवैध गांजाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती बुधवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. यानुसार बुलढाणा एलसीबीचे पोलीस निरिक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एपीआय नंदकुमार काळे, निलेश सोळंके, धाड येथील ठाणेदार मनिष गावंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा : 

Back to top button