छत्रपती संभाजीनगर : परिचारिकेने बॅन्डेज कापताना चक्क बाळाची कापली करंगळी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : परिचारिकेने बॅन्डेज कापताना चक्क बाळाची कापली करंगळी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सलाइन लावण्यासाठी सहा महिन्याच्या बाळाच्या हाताला लावलेले बॅन्डेट कापताना परिचारिकेने चक्क बाळाची करंगळी कापल्याचा धक्कादायक प्रकार १८ ऑक्टोंबरला घाटी रुग्णालयात घडला होता. याप्रकरणी शेख रिजवान शेख कमरोद्दीन (३४, रा. बाबर कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या परिचारिकेविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती पटारे असे या परिचारिकेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रिजवान शेख यांच्या सहा महिन्यांच्या बाळाला न्यूमोनिया झाला होता. त्यामुळे त्याला १८ ऑक्टोंबरला घाटी रुग्णालयात वार्ड क्र. २४ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.उपचारादरम्यान बाळाच्या उजव्या हाताला सलाईन लावताना परिचारिकेने करंगळीला बॅंडेज लावले होते. सलाईन फेल झाल्याने बाळाच्या हाताची सलाईनची सुई काढण्यासाठी करंगळीला लावलेले बॅंडेज कात्रीने कापत असताना आरती यांच्याकडून अर्धी करंगळीच कापली गेली. विशेष म्हणजे कापलेले करंगळीचे अर्धे बोट आरती पटारे हीने बॅन्डेजसोबतच फेकून दिले. त्यावेळी तिथे रिजवान शेख यांच्यासह पत्नी सायमा देखील तेथे होत्या. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात पटारेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव हे करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button