छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी सुखावला | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी सुखावला

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यासाठी परतीचा पाऊस यंदाही वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२०) पासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे केळगाव लघु प्रकल्प दोन दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाला होता. त्यांनतर आज ( दि.२४) चारनेर – पेंडगाव मध्यम प्रकल्पही ओव्हरफलो झाला आहे. पावसाची अशीच मेहरनजर राहिल्यास तालुक्यातील बऱ्याच भागातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

केळगाव व चारनेर – पेंडगांव धरण पुर्ण क्षमतेने भरले असून तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्प ४० टक्के, अजिंठा – अंधारी मध्यम प्रकल्प ४१ टक्के, हळदा – जळकी ३८ टक्के, उंडनगांव २६ टक्के, या धरणांची पाणी पातळी वाढत असल्याने तालुका सुखावला आहे.
मात्र दुसरीकडे पावसाळा संपत आलेला असतांनाही तालुक्यातील निल्लोड व रहिमाबद ही दोन्ही जलसाठे अद्यापही जोत्याच्या खालीच आहेत. त्यामुळे  या धोरणांवर अवलंबून असलेल्या गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती आहे.

हेही वाचा : 

Back to top button