Chhatrapati Sambhaji Nagar | संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, राजपत्र जारी | पुढारी

Chhatrapati Sambhaji Nagar | संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव, राजपत्र जारी

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे नाव आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव (Dharashiv)  करण्यात आले आहे. याबाबतची राजपत्रित अधिसूचना राज्य सरकारच्या महसूल विभागाने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, औरंगाबाद विभागाचे नाव छत्रपती संभाजीनगर विभाग, औरंगाबाद जिल्हा हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, औरंगाबाद उप-विभाग छत्रपती संभाजीनगर उप-विभाग, औरंगाबाद तालुका छत्रपती संभाजीनगर तालुका, औरंगाबाद गाव छत्रपती संभाजीनगर गाव म्हणून ओळखला जाईल.

 संबंधित बातम्या

दुष्काळसद़ृश परिस्थिती, अनुशेष आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात तब्बल सात वर्षांनंतर आज शनिवारी (दि. १६) राज्य मंत्रिमंडळाची होत आहे. (Marathwada Cabinet Meeting) या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलल्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

तर आता उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद उप-विभाग धाराशिव उप-विभाग, उस्मानाबाद तालुका धाराशिव तालुका आणि उस्मानाबाद गावाचे नाव धाराशिव गाव असे राहणार आहे.

शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. आता दोन्ही जिल्ह्यांची नावे, तालुके, विभागांचीही नावे बदलण्यात आली आहेत.

हे ही वाचा :

Back to top button