

Terrible accident on Kage-Kalamb road; ST bus hits parked truck
केज, पुढारी वृत्तसेवा: केजड्डुकळंब मार्गावर साळेगाव जवळील चिंचोली पाटी, हॉटेल लालपरी परिसरात गुरुवारी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कोल्हापूर-माजलगाव या एसटी बसची जोरदार धडक बसल्याने बसचा चालक, वाहक आणि इतर प्रवासी असे एकूण १३ जण जखमी झाले. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला असून या घटनेमुळे राज्य परिवहन विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीला धाव घेतली. अॅम्ब्युलन्सचे पायलट सुमित तेलंग यांनी जखमींना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच जय जोगदंड व त्यांच्या सहकाऱ्यांनीही जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. दरम्यान, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.
रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर आदळलेल्या एसटी बसची अशी आवस्था झाली आहे. दरम्यान गेल्या काही काळात एसटी बसचे अपघात वाढत असल्याने वाहनांची तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि वाहतूक व्यवस्थापनाबाबत कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा निष्काळजीपणामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात घालणाऱ्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
अपघातात हे झाले जखमी
या अपघातातील जखमींची नावे चालक आनंद गायके (वय ४०), वाहक विष्णू तांबडे (वय ४२), संजय खरात (वय ३५), चैतन संजय खरात (वय १६), भास्कर गायकवाड (वय ३६), आशा खरात (वय २५), सचिन खरात (वय ३०), रोशनी खरात (वय १८), भाग्यश्री गायकवाड (वय ३०), पायल गायकवाड (वय १५), सुनिता खरात (वय ३२), सचिन सुरवसे (वय ४५), वैशाली राऊत (वय ३२) असे आहेत.
एसटीच्या निष्काळजीपणावर संताप
रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला बस धडकणे ही गंभीर बाब मानली जात असून, या घटनेत चालकाची निष्काळजीपणा आणि एसटी महामंडळाच्या सुरक्षाविषयक दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला