Beed wrestling competition: बीड येथे होणार स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी दिली मान्यता

माजी आमदार तथा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे बीड जिल्हाध्यक्ष भीमराव धोंडे यांनी केलेली ही मागणी उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांनी मान्य केली
Beed wrestling competition
Beed wrestling competitionPudhari
Published on
Updated on

आष्टी : ऑलिम्पिक पदक विजेते आणि भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणारी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा – २०२६ बीड येथे आयोजित करण्याच्या मागणीला यश आले आहे. माजी आमदार तथा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे बीड जिल्हाध्यक्ष भीमराव धोंडे यांनी केलेली ही मागणी उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांनी मान्य केली आहे.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये बीड येथे स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा घेण्यास मान्यता देण्यात आली.

क्रीडा क्षेत्राविषयी विशेष आवड असलेले कुस्तीपटू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार भीमराव धोंडे यांनी ही मागणी मांडली होती. ही मागणी मान्य झाल्याने बीड जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक संधी उपलब्ध झाली आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे जिल्ह्यातील समृद्ध कुस्ती परंपरेला नवे बळ मिळणार असून ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू मल्लांना आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. तसेच युवा पिढीमध्ये पारंपरिक मातीतील कुस्तीबद्दल नव्याने प्रेरणा निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

जिल्ह्यात ही प्रतिष्ठेची स्पर्धा आयोजित होणार असल्याने क्रीडाप्रेमी, कुस्तीपटू आणि कुस्ती परंपरेशी जोडलेल्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आभार मानले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news