१५ आॅक्टोबर ते २४ आॅक्टोबर या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. आज (रविवारी) सकाळी नऊ वाजता तसीलदार तरंगे यांच्या हस्ते देवीची विधीवत महापुजा संपन्न झाली. यावेळी देवल कमेटीचे सचिव अँड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त भगवानराव शिंदे, राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, पृथ्वीराज साठे, कमलाकर चौसाळकर, प्रा. अशोक लोमटे, उल्हास पांडे, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, संध्या जाधव, गौरी जोशी, पूजा राम कुलकर्णी यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. महापुजेनंतर देवीची महाआरती करण्यात आली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रंचड गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.