परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या पावन धर्तीवर असलेले पाचवे ज्योतिर्लिंग मंदिर प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी आज (दि.८) हजारो भाविक दाखल झाले आहेत. परळीत मोठ्या उत्साहात आजपासून महाशिवरात्री पर्व साजरे केले जात आहे. या अनुषंगाने माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले.
यावेळी मुंडे यांच्यासोबत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, बहीण खा. डॉ.प्रीतम मुंडे व त्यांचा मुलगा चि. अगस्त्य असे कुटुंबीय उपस्थित होते. प्रभू वैजनाथाच्या दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरातील भाविकांशी संवाद साधला. तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित साबुदाणा खिचडी वाटप स्टॉलवर हजेरी लावत दर्शनार्थी भाविकांना फराळ खिचडीचे वाटपही केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :