Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाठीशी
Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
Published on
Updated on

Pankaja Munde Dasara Melava : गेल्या नऊ दिवसांत नवरात्रोत्सवात देवीची उपासना केली. जातीवादाचे, धर्मवादाचे राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळू दे, अशी प्रार्थना मी केली आहे. आज समाजाला एकत्र आणणे गरजेचे आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे आहेत, अशी ग्‍वाही भाजप नेत्‍या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज विजयादशमीनिमित्त भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात त्‍या बोलत होत्‍या

सीमोलंघन ही एक परंपरा

सीमोलंघन ही एक परंपरा आहे. नैसर्गिक आपत्ती असूनही तुम्ही दसरा मेळावा यशस्वी केला, याबाबत मी तुमचे अभिनंदन करते.अत्यंत संघर्षाने उभा राहिलेला हा मेळावा आहे. दरवर्षी भगवान गडावरील मेळाव्याला राज्यातून गर्दी होते. हे सर्व लोक स्वत:हून आले आहेत.आज मराठवाड्यावर नैसर्गिक संकट आले तरी दसरा मेळाव्याची परंपरा आपण जपली आहे, असेही पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या.

Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
Pankaja Munde flood relief survey: अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून दिलासा; मंत्री पंकजा मुंडे यांचा पाथर्डी दौरा

संघर्ष हा आपल्याला वारशातूनच मिळाला

संघर्ष हा आपल्या वारशातूनच मिळालेला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या सारखाच माझाही संघर्ष सुरू आहे. मी कधीच जात पाहिलेली नाही. माणुसकी हाच माझा धर्म आहे, मराठवाड्यातील लोकांचे संसार वाहून गेले आहेत. लोकांचे दु:ख पाहून मी हेलावून गेले. मी माझ्या वेदना शब्दांत मांडू शकत नाही.नैसर्गिक आपत्तीत जाती-पातीचे बंध गळून पडले आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
OBC Reservation: ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, समिती गठीत; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांची ग्वाही

अशी बेशिस्‍त यापूर्वी मेळाव्‍यात पाहिली नव्‍हती

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्‍या भाषणावेळी गर्दीतून जोरदार घोषणाबाजी होत होती. यावर दोघांनीही तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली. पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या की, तुम्‍ही भगवान गडाचा दसरा हिरावून घेतला आहे. आता मेळावाही हिवून घेताय असे वाटते. तुम्‍ही लोक शुद्धीवर नाही. तुम्‍हाला स्‍वत:च्‍या वर्तनाचील लाजा वाटली पाहिले. गोंधळ घालणार्‍यांनी कितीही माझ्‍या नावाच्‍या घोषणा दिल्‍या तरी तुम्‍ही पवित्र होणार नाही. अशा प्रकारची बेशिस्त मी यापूर्वी मेळाव्यात पाहिली नव्हती, अशा शब्‍दांत यांनी गोंधळ घालणार्‍यांना फटकारले.

Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
Pankaja Munde flood relief survey: अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून दिलासा; मंत्री पंकजा मुंडे यांचा पाथर्डी दौरा

जातीवादी, धर्मवादी राक्षण नष्‍ट करण्‍याची शक्ती मिळाे

नवरात्रोत्‍सवात आमच्‍या घरात मासांहार नाही की, कांदा-लसूण नाही. नऊ दिवस आम्ही देवीची पूजा केली. या देवींनी महिषासुर, रक्तबिजासारखा राक्षस संपवून टाकला आहे हे सांगताना त्यांनी आज रक्तबीजासारखा राक्षस जन्माला आलाय. तुमच्या मेंदूत जन्माला आला. चुकीच्या निर्णयातून, संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात. जातीचे राक्षस, धर्मवादाचे राक्षस आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले. तर देवीला प्रार्थना करते मला जातीवादी राक्षस, धर्मवादी राक्षस नष्ट करण्याची शक्ती दे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
Vaishnavi Hagawane: जगण्याचा हक्क हिरावणार्‍यांना अत्यंत कडक शिक्षा होईल; पंकजा मुंडे यांचा वैष्णवीच्या माता-पित्याला शब्द

महापुराच्‍या काळात माणुसकीचा धागा कायम

महापुराच्‍या काळात मी बौद्ध समाजातील माणसाच्या घरी गेले. तर माझा वंजारा समाजाचा माणूस राशन घेऊन गेला. कैकाडी समाजाच्या कुटुंबाला राशन दिलं. यातून जाती गळून पडत आहे. मला आनंद आहे की, जाती गुंडाळून माणुसकीचा धागा जोडण्याचं काम आपण केलं. एक एकर जमीन विका पण शिका असे भगवान बाबा म्हणायचे. मी तुम्हाला आवाहन करते की दोन घास कमी खा. पण स्वाभिमानाने राहा. कुणाचे तुकडे उचलू नका. चांगल्या माणसाचं चांगलं होतंय. भगवान बाबांचे आशीर्वाद सोबत आहेत, असेही पंकजा मुंडे म्‍हणाल्‍या.

Pankaja Munde Dasara Melava : "जातीवादी राक्षस नेस्तनाबूत करण्याची शक्ती मिळो..." : जाणून घ्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक पाच मुद्दे
OBC subcommittee meeting : ओबीसी उपसमितीच्या बैठकीत भुजबळ, पंकजा आक्रमक

माझी बहीण पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईल : धनंजय मुंडे

प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी मी सर्व काही केले. ओबीसीमध्ये आल्यानंतर मराठ्यांना तोटा होईल."याच्या ताटातलं काढून त्याच्या टाकात टाकू नका. खुर्चीसाठी कोणाला फसवत आहात?", अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आरक्षणावर आपले मत मांडले.माझ्याविरोधात मीडिया ट्रायल करण्यात आली. न्यायालयाने संबंधितांना दंड ठोठावला तरीही मी शिक्षा भोगतो आहे.आजचा मेळावा अभूतपूर्व आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळावा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला."माझी बहीण मंत्रीमंडळात आहे. ती पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देईल," असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news