Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; पाटोदा येथे उपचार सुरू

डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा दिला सल्ला
Manoj Jarange Patil Health Update
Manoj Jarange Patil Health Update Pudhari
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Health Update

पाटोदा, पुढारी वृत्तसेवा: मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना मंगळवारी रात्री पाटोदा येथे मुक्काम नियोजित करण्यात आला होता. त्याप्रमाणे रात्री सभा झाल्यानंतर मुक्काम देखील करण्यात आला; परंतु सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने पाटोदा या ठिकाणीच त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला आहे.

२९ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. या दरम्यान त्यांनी मुंबईला जाणार असल्याचे जाहीर केले होते. नियोजित दौऱ्याप्रमाणे जरांगे पाटील हे मंगळवारी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघाले होते. गेवराई व बीडमध्ये त्यांचे स्वागत झाल्यानंतर पाटोदा येथे रात्री दोन वाजता जाहीर सभा पार पडली.

Manoj Jarange Patil Health Update
Ashish Shelar : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनाच का टार्गेट करताय? मंत्री शेलारांचा जरांगेंना सवाल

जरांगेंचे प्रकृतीच्या तक्रारीविषयी जाहीररीत्या भाष्य

या सभेदरम्यानच त्यांनी आपल्या प्रकृतीच्या तक्रारीविषयी जाहीररीत्या भाष्य केले होते. "माझ्या पोटात आग पडल्यासारखे झाले आहे. ही आग कमी झाली तरच मी पुढे जाऊ शकेन, अन्यथा मला जाणे शक्य होणार नाही. दौऱ्यापेक्षा आरक्षण महत्त्वाचे आहे," असे त्यांनी म्हटले होते.

Manoj Jarange Patil Health Update
Manoj Jarange Patil : जरांगे-पाटलांच्या स्वागतासाठी गेवराईत लोटला जनसागर

सकाळी प्रकृती आणखीनच खालावली

रात्री मुक्काम केल्यानंतर सकाळी त्यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता तातडीच्या उपचाराची गरज व्यक्त केली. यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज व श्री बंकट स्वामी संस्थानाचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे हे पाटोदा येथे दाखल झाले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याविषयी विनंती केल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार जरांगे पाटील यांच्यावर उपचार करण्यात येत असून सकाळपासून चार सलाईन देण्यात आल्या आहेत. अजून तासाभराने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतचे अपडेट्स कळू शकणार असून, त्यानंतरच मनोज जरांगे पाटील हे पुढील दौरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे करणार की रुग्णालयात दाखल होणार हे देखील कळू शकणार आहे.

Manoj Jarange Patil Health Update
Manoj Jarange Patil: मराठा बांधवांनी सरकारला दिली ऑफर; पाडोद्यात या अन् मागण्या मान्य करा

पाटोदा शहरात आंदोलकांची गर्दी कायम

मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना त्यांच्यासोबत जाण्यासाठी हजारो मराठा समाजबांधव निघालेले आहेत. आज नियोजित वेळेप्रमाणे जरांगे पाटील हे श्रीगोंदा येथे मुक्काम करणार होते, परंतु पाटोदा येथेच उपचार घेण्याची वेळ आल्याने आता त्यांच्यासोबतचे आंदोलक देखील पाटोदा मुक्कामी थांबले आहेत.

Manoj Jarange Patil Health Update
Manoj Jarange-Patil : ‘आरक्षणाचा निर्णय घेऊन पप्पांचे उपोषण सोडवा, एखाद्याचा इतका जीव...’, जरांगेंच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर

पोलीस बंदोबस्त वाढवला

मनोज जरांगे पाटील हे पाटोदा येथून बुधवारी सकाळी श्रीगोंदा येथे जाणार होते, परंतु बुधवारी दिवसभर त्यांच्यावर पाटोदा येथेच उपचार सुरू असल्याने या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news