Vaibhavi Deshmukh HSC Result |मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या लेकीच्या पाठीवर कौतुकाची थाप

Beed Santosh Deshmukh | १२ वीच्या परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल पत्राद्वारे अभिनंदन
Vaibhavi Deshmukh HSC Result
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या लेकीच्या पाठीवर कौतुकाची थाप Pudhari Photo
Published on
Updated on

Vaibhavi Deshmukh HSC Result |

पुढारी ऑनलाईन डेस्क : संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरला होता. त्यांच्या कुटुंबावरही आघात झाला होता. या तणावाच्या परिस्थितीत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवी हिने मनावर दगड ठेवून बारावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत विज्ञान शाखेतून ८५. ३३ % गुण मिळवत तिने यश संपादन केले. याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. आज निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैभवी हिला पत्र पाठवून तिचे कौतुक केले.

Vaibhavi Deshmukh HSC Result
Vaibhavi Deshmukh HSC Result | 'डोळ्यात पाणी, ह्रदयात दुःख': दिवंगत संतोष देशमुखांच्या लेकीचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

वैभवी, अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत तु बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहेस. तुझा यशाबद्दल तुझ्या वडिलांना आनंद झाला असता पण दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत. ८५.३३ टक्के गुण मिळवून तू अनेक विद्यार्थी-विद्यार्थींनींसमोर आदर्श निर्माण केला आहेस. तु अशीच प्रगती करीत रहावीस. तुझ्या प्रवासात आमचा पाठिंबा राहील, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनावर दगड ठेवून दिली होती परीक्षा

वडिलांच्या हत्येनंतर वैभवी मानसिक तणावाखाली होती. तरीही तिने मनावर दगड ठेवून विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. बारावीचा पहिला पेपर देऊन आल्यानंतर तिने माध्यमांसमोर येत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. यावेळी ती म्हणाली होती की, पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस माझे वडील तिच्या सोबत नव्हते. परीक्षेचे तीन तास म्हणजे खूप कठीण होते. आधी तर मानसिकताच नव्हती. पेपर सोडवत असताना तिला प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते होती. पेपरला जाण्या अगोदर मनात कोलाहाल निर्माण झाला होता. त्यानंतर तिने ठरवलं की, नाही; पेपर द्यायलाच हवा. वडिलांचे जे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचं आहे.

Vaibhavi Deshmukh HSC Result
संतोष देशमुख हत्‍याप्रकरणी आरोपींना फाशी व्हावी : गृहराज्‍यमंत्री योगेश कदम

वैभवी देशमुख हिला मिळालेले विषयावर गुण

इंग्रजी- ६३,

मराठी- ८३,

गणित- ९४,

फिजिक्स - ८३,

केमिस्ट्री- ९१

बायोलॉजी - ९८

एकूण ६९९ पैकी ५१२ गुण मिळाले आहेत.

Pudhari
Vaibhavi Deshmukh HSC Result
संतोष देशमुख हत्या प्रकरण: डॉक्टरांच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news