

केज :- संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्दतीने हत्या करण्यात आली. त्या सर्व मारेकऱ्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हायला हवी असे माझे वैयक्तिक मत आहे. जर या हत्या प्रकरणातील कोणत्याही कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असेल तर ते गैर असून त्याची सुद्धा चौकशी केली जाईल. तसेच या सर्व प्रकरणाकडे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे या सर्व प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे त्यांच्या पूर्वीच्या गंभीर गुन्ह्यातील फरारी आरोपी असताना त्यांची पोलीस अधिकाऱ्यां सोबतची उठबस हे आक्षेपार्ह असल्याचे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले. आणि अशा अधिकाऱ्यांचे फक्त निलंबन करून भागनार नाही तर त्यांना कायमचे बडतर्फ करायला हवे. असा सज्जड दमही दिला.
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दि. ४ एप्रिल रोजी मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, बाजीराव चव्हाण, विधान सभा प्रमुख दादासाहेब ससाणे, तालुका अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किसन कदम यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांनी त्यांना संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्या नंतर गावकरी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावेळी पोलिसांनी त्यांना चुकीची माहिती दिली. तत्कालीन पोलीस आणि पोलीस अधिकारी यांचे गुन्हेगारांशी सबंध होते. यातील आरोपी यांच्यावर पूर्वी खंडणी, अपहरण व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना आणि ते फरार असताना त्यांची केज पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी कायम संपर्क होता. हे त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत असून वाल्मीक कराडला कारागृहात कारागृह प्रशासन हे व्हिआयपी ट्रीटमेंट देवून त्याची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप यावेळी गावकऱ्यांनी केला. त्यावेळी बोलताना ना कदम म्हणाले की,मी ना. एकनाथ शिंदे यांचा संदेश घेवून आलेलो आहे. यातील मुख्य आरोपींना बीड कारागृहा ऐवजी इतरत्र स्थलांतरित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे ते चर्चा करणार आहेत.
संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना कठोर शासन व्हावे आणि या प्रकरणात कोणतीही कसूर राहू नये म्हणून सरकार दक्षता घेत आहे. या प्रकरणात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या काळा प्रमाणे न्याय व्हावा अशी अपेक्षा कदम यांनी व्यक्त केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी जर बाहेरील कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना कोठडीत टाका आणि कठोर कारवाई करा असा आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे.
केज पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन हे केज पोलीस ठाण्यात येत असल्याचा संशय वैभवी देशमुख हिने गृहराज्यमंत्र्याकडे यावेळी व्यक्त केला.