Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू

तसेच धनेगाव येथे एका उभ्या कारवर झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे
Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : तालुक्यात शनिवार २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ वा. च्या सुमारास युसुफवडगाव मंडळात अचानक कडाक्याच्या वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी सोनिजवळा येथे शेतात काम करत असताना वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दिगंबर ससाणे, वय (५० वर्ष) यांनी एका मोठ्या आंब्याच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्याच आंब्याच्या झाडावर अचानक वीज कोसळली आणि झाड उन्मळून पडले. त्याच झाडाखाली उभे असलेले दिगंबर ससाणे यांचा जागीच मृत्य झाला.

Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू
Solapur Rain: बार्शी तालुक्यात अवकाळीचा शेतकऱ्यांना फटका

शनिवार दि. २३ मे रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास प्रचंड उकाड्यानंतर अचानक काळ्या ढगांनी आभाळ भरून आले. त्यानंतर सोसायट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह युसुफवडगाव महसूल मंडळातील युसुफवडगाव सह सोनिजवळा, धनेगाव, भालगाव, बावची, साळेगाव, माळेगांव, सुर्डी, सोनेसांगवी, सुकळी, गोटेगाव, मोटेगाव, बोबडेवाडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले.

Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू
Lightning Strike: अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून महिलेसह तिघांचा मृत्यू, पिकांचे प्रचंड नुकसान

सोनिजवळा येथे शेतात काम करीत असलेले ५० वर्ष वयाचे दिगंबर ससाणे हे आंब्याच्या झाडाच्या निवाऱ्याला उभे राहिले होते. दरम्यान आंब्याच्या झाडावर वीज कोसळून ते झाड उन्मळून पडल्याने झाडाखाली दाबून दिगंबर भीमराव ससाणे यांचा जागीच गतप्राण झाले. तर नियतीचा खेळ इथेच संपताच दिगंबर ससाणे यांच्या घरासमोर असलेले चिंचेचे झाड देखील उन्मळून पडले. तसेच धनेगाव येथे एका उभ्या कारवर झाड पडल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Beed news | बीडमध्ये अस्मानी संकट! अवकाळी पाऊस अन् वादळी वाऱ्यासह वीज कोसळली; झाडाखाली आसरा घेतलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू
Satara stormy rain: वादळी पावसाने हाहाकार; घरांची पडझड

अनेक ठिकाणी विजेचे खांब व रोहित्र याचे खांब पडल्याने नुकसान झाले असून काढणीला आंब्याचा वादळामुळे खच पडला आहे. तालुक्यातील अनेक गावात अनेकांच्या घरांचे पत्रे देखील उडून गेले आहेत. दरम्यान प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तालुक्यातील ग्राममहसूल अधिकाऱ्यांना नुकसानीची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news