Beed Crime News : गंगावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

तालुक्यातील गंगावाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास मारहाण केल्याची घटना घडली.
Crime News
Beed Crime News : गंगावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखलFile Photo
Published on
Updated on

Beaten up over minor reasons in Gangawadi; Case Registered Against Four Individuals

गेवराई, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील गंगावाडी येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी येथे घडली होती.

Crime News
Crime News : रस्ता दुरुस्तीच्या कारणावरून पिस्तूल दाखवून जबर मारहाण

२४ मार्च रोजी रात्री भगवान विष्णू हातागळे (वय ३०) यांनी तक्रार दाखल केली. यानुसार, आरोपी दत्ता गंगाराम कारके, काली गंगाराम कारके, निलाबाई कैलास सुतार व भद्री चव्हाण (सर्व रा. गंगावाडी) यांनी संगनमत करून फिर्यादीच्या घरासमोर वाद घालत शिवीगाळ केली.

Crime News
Beed Crime : गुंडगिरीचा नंगानाच; हॉटेल व्यावसायिकावर हल्ला

तसेच मोटारसायकल उभी करण्याच्या कारणावरून वाद वाढत जाऊन आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी जखमी झाला असून, त्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी देवकते हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news