Crime News : रस्ता दुरुस्तीच्या कारणावरून पिस्तूल दाखवून जबर मारहाण

तालुक्यातील रोहितळ (ता. जातेगाव) येथे रस्ता दुरुस्तीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर पिस्तूल दाखवत बेदम मारहाण केली.
Crime News
किरकोळ कारणावरून लोखंडी पाईपने बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हाFile Photo
Published on
Updated on

Severe beating at gunpoint over a road repair dispute

गेवराई, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रोहितळ (ता. जातेगाव) येथे रस्ता दुरुस्तीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून एका कुटुंबावर पिस्तूल दाखवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रकरणी सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Dharashiv news | उचलीच्या पैशांवरून अमानुष छळ; भूम तालुक्यात ऊसतोड मजुराने जीवनयात्रा संपवली

गेवराई तालुक्यातील रोहीतळ येथील फिर्यादी गवळण लक्ष्मण खरात (वय ६०) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी राजेश पवार यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, त्यासाठी आणलेल्या साहित्यामुळे घरासमोरील रस्ता खराब झाला होता.

परिणामी १८ मार्च रोजी फिर्यादींचा मुलगा ज्ञानेश्वर याचा पाय घसरून पडल्याची घटना घडली. दुसऱ्या दिवशी, १९ मार्च रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ज्ञानेश्वर याने पवार यांना रस्ता दुरुस्त करण्यास सांगितले. याचा राग आल्याने राजेश पवार यांनी ज्ञानेश्वरची गचांडी धरून जातिवाचक शिवीगाळ केली.

Crime News
Jalna Accident | परतूर-वाटूर रस्त्यावर टेम्पोने दुचाकीला उडवले, दोघे तरुण जागीच ठार

यावेळी त्यांच्या कमरेला पिस्तूल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर आरोपींनी एकत्र येत ज्ञानेश्वरवर हल्ला चढविला. कुऱ्हाड व कोयत्याने मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले.

ितेश पवार याने ज्ञानेश्वरच्या डोक्यात दगड मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. वादावादीदरम्यान फिर्यादी गवळण खरात यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही तुटून पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपींकडून जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news