Beed Politics: गेवराई मतदारसंघात राजकीय भूकंप! माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics latest news update: परळी येथे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
Beed Politics
Beed Politics
Published on
Updated on

बीड: गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा

माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांचा हा महत्त्वपूर्ण प्रवेश सोहळा रविवारी (दि.२६ ऑक्टोबर) रोजी परळी येथे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते.

Beed Politics
Beed Political News : बीडचा नगराध्यक्ष भाजपचाच होणार : देशमुख, मुंदडा, लोढा

विकासाच्या पर्वात सहभागी; बदामराव आबा पंडित

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बदामराव आबा पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेवराईत विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे. त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी निवडणुकांमध्ये आम्ही बाळराजे पवार यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.”

Beed Politics
Beed Political News : प्रत्येक गरिबाला आरक्षण मिळालेच पाहिजे : आ. अमित गोरखे

राजकीय समीकरणांना वेग

बदामराव पंडित यांच्या या प्रवेशामुळे गेवराई मतदारसंघात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे गेवराई आणि परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली असून, भाजपच्या संघटनात्मक बळाला मोठे पाठबळ मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Beed Politics
Beed Political News : जरांगे पाटील यांची डॉ. क्षीरसागरांनी घेतली भेट

आबांच्या प्रवेशाने शिवसेनेला खिंडार

गेवराई तालुक्यात लोकनेते म्हणून ओळख असलेल्या बदामराव 'आबा' यांना मानणारा मोठा वर्ग आहे. आबांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. विशेष म्हणजे, बदामराव पंडित यांच्या या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news