

Dr. Kshirsagar met Jarange Patil
बीड, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीजवळील अंकुश नगर येथे सोमवारी (दि.४) सदिच्छा भेट घेतली.
बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील आणि डॉ. योगेश क्षीरसागर यांची एका कार्यक्रमात भेट झाली होती. त्यानंतर डॉ. क्षीरसागर यांनी सहकाऱ्यांसोबत निवांत सदिच्छा भेट घेतली. यावेळी सामाजिक, राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. संवाद साधत असताना त्यांचा सकारात्मक मिळालेला प्रतिसाद हा पुढील वाटचालीसाठी नवऊर्जा देणारा आहे, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी म्हटले. याप्रसंगी सरपंच अमोल बागलाने, देविदास जाधव हे उपस्थित होते.