बोरफडी येथे आज अभिनेत्री रिंकू राजगुरूंची भेट

समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धी उपक्रमांतर्गत मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू या बोरफडी येथे भेट देणार आहेत.
beed news
बोरफडी येथे आज अभिनेत्री रिंकू राजगुरूंची भेटfile photo
Published on
Updated on

Actress Rinku Rajguru's visit to Borfadi today

बीड, पुढारी वृत्तसेवा : गावांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धी उपक्रमांतर्गत मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू या आज (दि.२०) सकाळी १० वाजता बीड तालुक्यातील बोरफडी येथे भेट देणार आहेत.

beed news
Kej Crime | केज तालुक्यात मोटारसायकलवर मित्राच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

कार्यक्रमाचे आयोजन बोरफडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच कैलास घुगे व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विविध विकास योजना, उपक्रम व सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे.

beed news
Beed Crime News | धारूर येथील एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे तसेच गटविकास अधिकारी अनिकेत सानप उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान विविध विकासकामांची पाहणी तसेच नवीन कामांचा शुभारंभ होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news