Kej Crime | केज तालुक्यात मोटारसायकलवर मित्राच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
Crime Case
Crime News Pudhari
Published on
Updated on

Kej minor girl molestation case

केज : केज तालुक्यात एका मित्राच्या अल्पवयीन मुलीला मोटारसायकलवर दोघांच्या मध्ये बसवून गावाकडे परत जात असताना चालत्या मोटारसायकलीवर तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

दि. १६ फेब्रुवारी रोजी युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील अल्पवयीन मुलीच्या कान दुखीमुळे रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास तिचे वडील व त्यांचा मित्र तिला धनेगाव येथील दवाखान्यात घेऊन गेले होते. या भेटीत त्यांनी आपला मित्र किशोर कांबळे यालाही सोबत घेतले.

Crime Case
Kej Crime | अल्पवयीन सावत्र बहिणीचे अपहरण; १२ तासांत सुटका, सावत्र भाऊ ताब्यात

दवाखान्यात मुलीच्या कान दुखीवर उपचार करून रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास ते तिघे मोटारसायकलवर परत जात असताना, मुलीचे वडील मोटारसायकल चालवत होते आणि किशोर कांबळे व मुलीचे वडील यांच्यामध्ये मुलगी बसलेली होती. या दरम्यान, किशोर कांबळे यांनी मुलीशी असभ्य वर्तन केले. मुलीने ही घटना पालकांना सांगितली, त्यानंतर त्यांनी किशोर कांबळे यांच्या विरोधात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावरून किशोर कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी किशोर कांबळे याला अटक केली.

किशोर कांबळे याला न्यायालयात हजर केल्यावर दि. १८ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news