Sanjay Rathod : सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सूचना; मंत्रालयात झाली बैठक
Sanjay Rathod
Sanjay Rathod : सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा file photo
Published on: 
Updated on: 

A well-researched blueprint should be prepared to address irrigation issues

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील अप्पर (ऊर्ध्व) कुंडलिका प्रकल्प परिसरातील शेतकऱ्यांची सिंचनाची मागणी लक्षात घेता, अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे पाणी सध्या अस्तित्वात असलेल्या तलावांमध्ये साठवून त्याद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देता येईल का, याची व्यवहार्यता तपासावी, तसेच उपलब्ध जलस्रोत, सिंचनाची गरज आणि संभाव्य लाभक्षेत्र यांचा विचार करून सर्वंकष व अभ्यासपूर्ण आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Sanjay Rathod
Tiger Fear : बालाघाटात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा बीड जिल्ह्यात मुक्काम

वडवणी तालुक्यातील अप्पर (ऊर्ध्व) कुंडलिका प्रकल्प, सोन्नाखोटा डावा कालव्याचे अपूर्ण काम तसेच परिसरातील तांड्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांवर मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत बिचकुलदरा तांडा, सरकारखोरी तांडा आणि चौफाळदरा तांडा परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या परिसरातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अप्पर कुंडलिका प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. तसेच सोन्नाखोटा डावा कालव्याचे अपूर्ण काम पूर्ण करणे आणि संबंधित तांड्यांच्या परिसरातील लाभक्षेत्र वाढविण्याबाबत चर्चा झाली.

मृद व जलसंधारण विभागांतर्गत असलेल्या पाझर तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मंत्री राठोड यांनी दिल्या. याशिवाय परिसरात नवीन जलसंधारण तलाव मंजूर करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

Sanjay Rathod
शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८९ कोटी रुपये जमा

उपलब्ध जलस्रोत, सिंचनाची गरज आणि संभाव्य लाभक्षेत्र यांचा विचार करून सर्वंकष व अभ्यासपूर्ण आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करून परिसरातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करता येणार आहेत. या उपाययोजनांमुळे बिचकुलदरा, सरकारखोरी आणि चौफाळदरा तांडा परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास मदत होणार आहे. बैठकीस विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.