शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८९ कोटी रुपये जमा

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा ५७,८७३ शेतकऱ्यांना लाभ
beed news
शेतकऱ्यांच्या खात्यावर ५८९ कोटी रुपये जमाfile photo
Published on: 
Updated on: 

Rs 589 crore deposited into farmers' accounts

बीड, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त्ती योजना-२०२६' अंतर्गत बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या चौथ्या यादीनुसार जिल्ह्यातील ५७,८७३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर तब्बल ५८९ कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.

beed news
Beed - १५ वर्ष झाली डोक्यावरचा 'हंडा' उतरला नाही !

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. चौथ्या यादीतील जिल्ह्यातील ५७,८७३ शेतकऱ्यांना ५८९.९३ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.

यामध्ये बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या १,४८७ शेतकऱ्यांचे ६.९५ कोटी रुपये, तर उर्वरित रक्कम राष्ट्रीयकृत बँका व महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. यापूर्वी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीमधील राष्ट्रीयकृत बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १,१०,८७८ शेतकऱ्यांच्या एकूण ९१८.५६ कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीला मंजुरी मिळाली होती.

beed news
Beed News : बीड शहरात नवीन ट्रॅफिक पार्क आणि मनोरंजन केंद्राची उभारणी

आतापर्यंत बीड जिल्ह्यातील एकूण १,६८,७५१ शेतकऱ्यांना १५०८.४९ कोटी रुपये इतक्या विक्रमी रकमेची कर्जमुक्ती या योजनेमुळे मिळाली आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा यासाठी यापूर्वी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या यादीतील एकूण २०४,३६६ थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झाली होती, त्यापैकी आतापर्यंत १७५,४२९ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे.

अद्यापही जिल्ह्यातील २८,९३७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यापैकी तब्बल ११,०८० शेतकऱ्यांकडे 'फार्मर आयडी' (Farmer ID) उपलब्ध नाही. ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे, त्यांनी तात्काळ आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा उपनिबंधक सतिश तोटावार यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.