Tiger Fear : बालाघाटात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा बीड जिल्ह्यात मुक्काम

भुरेवाडीत घोड्याची शिकार; ट्रॅप कॅमेऱ्यात छायाचित्र कैद
Tiger Fear : बालाघाटात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा बीड जिल्ह्यात मुक्काम
Published on: 
Updated on: 

A tiger wandering through the Balaghat range has taken up residence in Beed district

बीड, पुढारी वृत्तसेवा: सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांतील बालाघाट डोंगररांगांमध्ये भ्रमंती करणाऱ्या वाघाने सध्या बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकला आहे. पाटोदा तालुक्यातील भुरेवाडी परिसरात या वाघाने सौताडा येथील रामेश्वर मंदिर संस्थानच्या घोड्याची शिकार केली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी घोड्याची शिकार केली, त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास वाघ पुन्हा आल्याचे वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे.

Tiger Fear : बालाघाटात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा बीड जिल्ह्यात मुक्काम
Beed Nagarparishad | सर्वसाधारण सभेतील ठराव रद्द करा

सौताडा येथील रामेश्वर मंदिर संस्थानचा घोडा भुरेवाडी शिवारात चरण्यासाठी सोडण्यात आला होता. याचदरम्यान वाघाने घोड्यावर हल्ला करून त्याची शिकार केली. दुसऱ्या दिवशी घोडा मृतावस्थेत आढळल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला मंदिर परिसरात आणून अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर वनविभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, सायंकाळी सातच्या सुमारास वाघ पुन्हा त्याच ठिकाणी आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे या परिसरात वाघाचा वावर असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वनविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले असून, शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Tiger Fear : बालाघाटात भ्रमंती करणाऱ्या वाघाचा बीड जिल्ह्यात मुक्काम
Beed Crime| ३० लाखांच्या खंडणीसाठी 'पवन चक्की'चे जेसीबी जाळून टाकण्याची धमकी

बालाघाटच्या डोंगररांगांमध्ये गेल्या काही दिवसांपासून या वाघाचा वावर सुरू आहे. आष्टी-जामखेड परिसरात काही दिवसांपूर्वी त्याचे वास्तव्य आढळून आले होते. त्यानंतर आता त्याने पाटोदा तालुक्यातील भुरेवाडी परिसरात आपला मुक्काम हलविल्याचे समोर आले आहे.

शेतात जाताना खबरदारी घ्या !

भुरेवाडी आणि परिसरातील शिवारात वाघाचा वावर असल्याने शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, विशेषतः पहाटे व रात्रीच्या वेळी अधिक खबरदारी घ्यावी. जनावरे उघड्यावर सोडू नयेत तसेच वाघ दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावण्याचा प्रयत्न न करता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.