मंदिर फोडणारे सराईत गुन्हेगार गजाआड दानपेटीसह ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

मंदिर फोडणारे सराईत गुन्हेगार गजाआड दानपेटीसह ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

नगर : पुढारी वृत्तसेवा :नेवासा परिसरात मंदिर चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन सराईत गुन्- हेगारांना जेरबंद केले. त्यांच्याकडून ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली.

आकाश ऊर्फ मलिंगा कचरू जगधने (वय २२), विशाल अरुण बर्ड (दोघे रा. गंगानगर, ता. नेवासा) असे अटक आरोपींची नावे आहेत. साथीदार अमर बर्डे, बंटा ऊर्फ सौरभ (दोघे रा. गंगानगर, ता. नेवासा) अशी पसार झालेल्या आरोपींची नावे आहेत.

एक जानेवारी रोजी रात्री चोरांनी औदुंबर चौक, नेवासा खु येथील दगदिवी मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून दानपेटी व रोकड असा ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत सुभाष एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर याच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, संदीप दरदंले, फुरकान शेख, किशोर शिरसाठ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे यांच्या पथकाने गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. हा गुन्हा आकाश ऊर्फ मलिंगा जगधने (रा. गंगानगर, ता. नेवासा) योन साथीदारासह केला आहे. तो ज्ञानेश्वर कॉलनी मागे काटवनात बसलेला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक आहेर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोन्ही संशयितांना पकडले.

त्यांना विचारपूस केली असता आकाश जगधने, विशाल बर्डे, अमर बर्डे, बंटा ऊर्फ सौरभ यांनी मिळवून वरील गुन्ह केल्याची कबुली दिली. अंगझडतीमध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख व विविध कंपनीचे ४ मोबाईल फोन असा एकूण ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींकडून पाच गुन्ह्याची उकल झाली.

Back to top button