बीड : मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत; ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

बीड : मनोज जरांगे- पाटील यांचे जल्लोषी स्वागत; ठिकठिकाणी पुष्पवृष्टी

बीड, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे – पाटील यांच्या रॅलीला बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरूवात झाली. या रॅलीत हजारो मराठा बांधव सहभागी झाले असून प्रचंड उत्साह दिसून येत आहे. जागोजाग जरांगे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येत आहे.

जरांगे – पाटील यांची आज शनिवारी (दि.२३) दुपारी २ वाजता सोलापूर- धुळे महामार्गावरील पाटील मैदानात जाहीर सभा होणार आहे. अल्टीमेटम संपण्यापूर्वीची ही शेवटची सभा असल्याने निर्णायक इशारा सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला बीडसह शेजारच्या जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, आज दुपारी १२.३० वाजता बीडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीला सुरूवात झाली. रॅलीदरम्यान तब्बल दोनशे जेसीबीच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर फुलांची उधळण केली. रॅली सुभाषरोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दिशेने जाताना जागोजागी जरांगे यांच्यावर फुलांची उधळन करण्यात आली. रॅलीत सहभागी मराठा बांधवांचा प्रचंड उत्साह दिसून आला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news