बीड : सौरपंप खरेदी प्रकरणात अर्धा मसला येथील शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक | पुढारी

बीड : सौरपंप खरेदी प्रकरणात अर्धा मसला येथील शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : मौजे अर्धा मसला येथील एका शेतकऱ्याची सौरपंप खरेदी प्रकरणी ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (दि. २४) सोलार मंजूर झाल्याच्या मेसेजमुळे १९ हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार या शेतकऱ्याने बीड सायबर पोलिसांत दिली आहे.

अंगद राऊत यांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली आहे. मौजे. अर्धा मसला येथील ते रहिवासी आहेत. त्यांना रविवारी (दि. २४)  सकाळी एक अज्ञात मॅसेजवरुन कुसुम सोलार मंजूर झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये एक लिंक देऊन आवश्यक ती माहिती भरुन १९ हजार ३८० रुपये भरण्यास सांगिण्यात आले. या मेसेजमध्ये दिलेल्या सुचनेनुसार राऊत यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मात्र राऊत यांनी या मेसेजची नंतर अधिक चौकशी केली असता त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. सायबर पोलीस या फसवणूक प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button