बीड: अहमदाबाद येथील नेमबाज स्पर्धेसाठी धारूरच्या जागृती तिवारीची निवड

बीड: अहमदाबाद येथील नेमबाज स्पर्धेसाठी धारूरच्या जागृती तिवारीची निवड

धारूर, पुढारी वृत्तसेवा : गुजरात येथील अहमदाबाद येथे दि. 18 ते 29 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय नेमबाज स्पर्धेसाठी धारूरची पिस्तूल नेमबाज जागृती तिवारी हिची निवड झाली आहे. एअर पिस्तूल सब युथ गटात महाराष्ट्राच्या संघात तिची निवड झाली आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, दादर नगर हवेली, दीव – दमण या राज्यांमधून सुमारे 1800 रायफल व पिस्तूल नेमबाज सहभागी होणार आहेत.

जागृतीने राज्य नेमबाजी स्पर्धेमधून खूप कमी कालावधीत चांगली कामगिरी करत या स्पर्धेत पात्रता मिळवली आहे. या यशासाठी तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नेमबाजी केंद्रात प्रशिक्षक संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करत आहे. पाचशे किलोमीटरचा प्रवास करून तिने प्रशिक्षण घेतले. तिचे औरंगाबाद जिल्हा रायफल संघटनेचे अध्यक्ष व पोलीस आयुक्त मनोज लोहिया, संघटनेचे पदाधिकारी अनंत बर्वे, मनीष धूत, उमेश पटवर्धन, हेमंत मोरे, धारूर येथील प्रमोद कुमार तिवारी, दुष्यंत तिवारी, अतुल शिनगारे, धारूर येथील 1997 दहावी बॅचमेट ग्रुप यांनी जागृतीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news