बीड : कुख्यात दरोडेखोर अटल्या, धोंड्या, होम्या गजाआड; दीडशेहून अधिक गुन्ह्यातील वाँटेड

बीड : कुख्यात दरोडेखोर अटल्या, धोंड्या, होम्या गजाआड; दीडशेहून अधिक गुन्ह्यातील वाँटेड
Published on
Updated on

बीड, पुढारी वृत्तसेवा ः चोरी, वाटमारी, दरोडा, खून, अत्याचार अशा वेगवेगळ्या दिडशे गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेल्या कुख्यात गुंडाना पोलिसांनी अटक केली आहे. अटल्या उर्फ अटल ईश्‍वर भोसले, युवराज उर्फ धोंड्या ईश्‍वर भोसले, हाम्या उर्फ हामरा उद्धव काळे यांना आष्टी पोलिसांनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रविवारी रात्री आष्टी तालुक्यातील शिराळा शिवारात मोठ्या शिताफीने जेरबंद केले. यावेळी पोलिसांवरच सत्तुरने हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. परंतु, पुर्ण तयारीनिशी कारवाईस गेलेल्या पोलिसांनी पाचपैकी या तिघांना अटक करण्यात यश मिळवले तर अंधाराचा फायदा घेवून संदिप ईश्‍वर भोसले, शासूल नवनाथ काळे हे दोघेजण पसार झाले.

ताब्यात घेतलेल्या तिघांवर राज्यात तसेच परराज्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील जवळपास सत्तर गुन्हे समोर आले असून आणखी गुन्हे उघडकीस येवून ही संख्या जवळपास १५० पर्यंत जाईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईची माहिती देण्याकरिता पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे व कारवाई करणारे पोलिस निरीक्षक खेतमाळस यांची उपस्थिती होती. या आरोपींवर दोन ठिकाणी मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे. आता त्यांनी केलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस अधिक्षक ठाकुर यांनी सांगितले.

जेलमधून केले होते पलायन

ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत असून युवराज उर्फ धोंड्या भोसले हा सातारा जेलमधून पळाला होता. तर अटल्या हा दोन वेळेस पोलिसांच्या ताब्यातून निसटला आहे. आष्टी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांना राज्यभरातील पोलीस ठाण्यातून संपर्क केला जात असून या तिघांनी केलेल्या गुन्ह्यांबाबत माहिती दिली जात आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news