औरंगाबाद : राष्ट्रवादीतून प्रदीप सोळुंके यांची हकालपट्टी

औरंगाबाद : राष्ट्रवादीतून प्रदीप सोळुंके यांची हकालपट्टी
Published on
Updated on

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून प्रदीप सोळुंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमदेवाराविरुद्ध अर्ज भरत बंडखोरी केली. दरम्यान, १६ जानेवारी हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र, प्रदीप सोळुंके यांनी स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करत पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही हकालपट्टी केली आहे.

राज्यातील विधान परिषद व पदवीधर मतदारसंघातील निवडणूका जाहीर झाल्या आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात विक्रम वसंतराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत. ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत, असे गर्जे यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news