प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Pragya Satav
Pragya Satav

आखाडा बाळापूर;पुढारी वृत्तसेवा :  आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवार(दि.०८) सायंकाळी कसबे धावंडा येथे एकाने  हल्ला केला.  राज्‍यभरात या हल्ल्याचा  निषेध केला जात आहे. हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज (दि.९) सकाळी आखाडा बाळापूर येथील पोलिसांना निवेदन देत, हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  कुणाच्या सांगण्यावरून हा हल्‍ला झाला, याचा तपास पोलिसांनी करावा.  यामागील सूत्रधार कोण?  याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. यावेळी  काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भगवान खंदारे, अभय सावंत ,डॉक्टर अरुण सूर्यवंशी, शफी डोंगरगावकर, संदीप सावंत, पंजाबराव पतंगे, शैलेश देशमुख , अल्फाराज कुरेशी ,मनोज सावंत, भाऊराव सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी संतोष पतंगे ,एस कोकरे, माधव खुडे, अजिंक्य आदी. उपस्थित होते.

हल्‍ला प्रकरणातील आरोपीला आखाडा बाळापूर पोलीसांनी गुरुवारी (दि.९) सकाळी अटक केली आहे. त्याची कसून तपासणी सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधणापोड यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news