Pradnya Rajeev Satav : राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला | पुढारी

Pradnya Rajeev Satav : राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर जीवघेणा हल्ला

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांची पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारीसायंकाळी हल्ला करण्यात आला. डॉ. सातव यांनी स्वत: सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली.

कळमनुरीच्या कसबे धवांडा येथे हा प्रकार घडला. ट्विटरवर पोस्ट करुन त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी दौर्‍यावर होते, त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न होता. एका महिला आमदारावर हल्ला होणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. पाठीमागून भ्याड हल्ले करु नका, समोरुन येऊ लढा, असे प्रज्ञा सातव यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुढे ते असंही म्हणाल्या की, माझे पती गेल्यानंतर माझ्या कुटुंबात कर्ता धर्ता मीच आहे. मला आज काही झाले असते तर कुटुंबासाठी अवघड झालं असतं. मी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. शांत न बसता पोलिसांकडे तक्रार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी कोणाचेही वाईट केले नाही. मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन कारण राजीव भाऊंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई , इंदिराजी यांसारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले. मात्र त्यांनी घरी न बसता आपले चांगले काम सुरू ठेवले. हा माझ्यावर पूर्वनियोजित हल्ला होता, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button