Somaiya vs Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे वित्त मंत्रालयाला सादर; किरीट सोमय्या | पुढारी

Somaiya vs Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे वित्त मंत्रालयाला सादर; किरीट सोमय्या

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव तसेच यामिनी जाधव यांच्या गैरव्यवहाराचे पुरावे आपण वित्त मंत्रालयाला दिले असून लवकरच त्यांच्यावर कारवाई होईल, अशी आशा आहे, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Somaiya vs Yashwant Jadhav)

एका कंपनीतून निखिल जाधव यांच्या कंपनीत पैसा आला. जाधव यांनी हा पैसा संयुक्त अरब अमिरातमध्ये फिरवला. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा हवाला व्यवहार केला आहे. याचे पुरावे आयकर विभागाच्या हाती लागले आहेत.

जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला आपण मदत करीत आहोत, असे सोमय्या म्हणाले. (Somaiya vs Yashwant Jadhav)

वसुली करणाऱ्या ठाकरे सरकारचे एक-एक कारनामे बाहेर येत आहेत. ईडीने देखील या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. हवाला व्यवहार झाल्याचे सिध्द झाले आहे. आता जाधव कुटुंबाने पुढे येउन याबाबत खुलासा करावा, असे सोमय्या यांनी नमूद केले.

हेही वाचा

Back to top button