बीड : मारहाणीत ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

बीड : मारहाणीत ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

माजलगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सोन्नाथडी येथे किरकोळ कारणावरून शिंदे, केंद्रे, तपसे यांच्यामध्ये भांडण झाले होते. हे भांडण पाहण्यासाठी घरातून ८० वर्षाची वृद्ध महिला बाहेर आली व खुर्चीवर बसली. हे पाहून केंद्रे नावाच्या व्यक्तीने त्या खुर्चीला लाथ मारली. यामुळे वृद्ध महिला खाली पडली व बेशुद्ध होऊन मृत झाल्याची घटना गुरुवार (दि. १८) रोजी सकाळी अकराच्या दरम्यान घडली.

माजलगाव तालुक्यातील सोन्नाथडी येथे गुरुवार रोजी सकाळी अकराच्या दरम्यान शिंदे ,केंद्रे, तपसे यांच्यामध्ये जुन्या वादावरून भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळ चालू झाली हे ऐकून घरात असलेल्या वृद्ध लक्ष्मीबाई शिंदे घराच्या बाहेर आल्या व खुर्चीवर बसल्या हे पाहून केंद्रे नावाच्या एक आरोपीने त्या खुर्चीला लाथ मारली. यामुळे खुर्चीवर बसलेल्या लक्ष्मीबाई शिंदे या खाली पडल्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या.

त्यांना वर्षा शिंदे यांनी पाणी पाजून घरात बसवले. यानंतर वर्षा शिंदे या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी गेल्या असता. त्यांना कळाले की, लक्ष्मीबाई मुंजा शिंदे यांना माजलगाव येथे उपचारासाठी आणत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मीबाई मुंजा शिंदे वय ८० वर्षे यांचे प्रेत शवविच्छेदन साठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठवले . याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news