बीड : केज-कळंब रोडवरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; दोघे गंभीर

बीड : केज-कळंब रोडवरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू; दोघे गंभीर

Published on

केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : केज कळंब रोडवर कमल पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटार सायकल व पीक-अप वाहनाच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत. त्यातील एकावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि १७ मे रोजी सायंकाळी ७:४५ वा.च्या सुमारास केज – कळंब रोडवर केज येथील कमल पेट्रोल पंपाच्या जवळच्या पुलाजवळ एका मोटार सायकलीला (क्र.एम एच-४४/आर-७४४६) समोरून येणारे पिकअप वाहनने (क्र.एम एच-०४/ जे यु-०१३८) जोराची धडक दिली. त्या नंतर ते पिकअप पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून खड्ड्यात जाऊन पलटी झाली.

या अपघातात मोटार सायकली वरील आकाश हजारे, गौतम हजारे आणि विशाल सिरसट हे गंभीर जखमी झाले होते. त्या नंतर उपचारा दरम्यान आकाश हजारे याचा मृत्यू झाला. तर विशाल सिरसट याच्यावर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गौतम हजारे याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news