परभणी : मानवतला ३० हजार ४६८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रशासनाकडून जय्यत तयारी | पुढारी

परभणी : मानवतला ३० हजार ४६८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रशासनाकडून जय्यत तयारी

मानवत; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येत असलेल्या मानवत तालुक्यात तहसील, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. शहरातील विविध भागातील एकूण २६ बुथवर महिला आणि पुरुष असे एकूण ३०,४६८ मतदार शुक्रवारी (दि.२६) मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३९८ मतदानकेंद्र असून १ लाख ९७ हजार ८९ महिला, १ लाख ८१ हजार ९२४ पुरुष तर १ तृतीयपंथी, असे एकूण तीन लाख ७९ हजार १४ मतदार आहेत. मानवत तालुक्यात ९९ मतदानकेंद्र असून प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिली.

दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर व रॅम्पची व्यवस्था

मतदानाची टक्केवारी वाढावी व समाजातील सर्व स्तरांमधील मतदारांना मतदान करता यावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ८५ वर्षावरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी नगरपरिषद प्रशासनाकडून पिक अँड ड्रॉप ची व्यवस्था करण्यात आली आहे, असे मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button