

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार गटाचा आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला असून या जाहीरनाम्याला 'शपथनामा' असे नाव देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात अग्नीवीर योजना रद्द करणार असल्याचे सांगितले आहे तसेच घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण यासोबतच काही महत्त्वाच्या घोषणा सुध्दा करण्यात आल्या आहेत.
'आम्ही मर्यादित जागा लढवत आहेत विविध प्रश्नांसंबधी आम्ही मांडणी केली आहे, त्याबाबत आमचे लोकं संसदेत आवाज उठवतील' असं पक्षाध्यक्ष शरद पवार जाहीरनामा प्रकाशनाआधी म्हणाले. "वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी लोकं जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीत आहेत. महिला आणि मुली, शेतकरी, कामगार, दिव्यांग, तृतीयपंथी, नागरी विकास, आरोग्य, पर्यावरण हे घटक डोळ्यासमोर ठेवून जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. पर्यटन, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे घेण्यात आले आहेत" असं वंदना चव्हाण म्हणाल्या. यावेळी जयंत पाटील यांनी जाहीरनाम्यातील मुद्दे मांडले.
हेही वाचा