सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचा भाव समाधानकारक नसल्याने नाराज झालेल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आज (दि. 9) खरेदी विक्री व्यवहार काही वेळ बंद पाडला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यासह विदर्भातील भागातून हळद उत्पादक शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणली होती. आज हळद खरेदीचा पहिला दिवस होता. शेतकऱ्यांना समाधानकारक मालाला भाव मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, भाव काही मिळत नव्हता. यामुळे नाराज हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. व हळद खरेदी विक्री व्यवहार बंद पडला. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी नाराज शेतकऱ्यांचा गैरसमज दूर केला. त्यानंतर पुन्हा व्यवहार सुरळीत सुरू झाला. हळदीला १३ हजार ७०० ते १५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र, हळद उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे व्यवहार काही वेळ बंद पडला.
हेही वाचा