परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी | पुढारी

परभणी : झिरोफाटा, भारती कॅम्पजवळ कार उलटली; तलाठी ठार, ५ जण जखमी

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे कारमधून पाहुण्याकडे अंत्यविधीसाठी जाताना परभणी मार्गावरील झिरोफाटा, भारती कॅम्पजवळील वळणावर कार उलटून तलाठ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. ही घटना आज (दि.१२) सकाळी घडली.
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील महसूल विभागात तलाठी पदावर कार्यरत असलेला‌ नाशीर खान मंशूर खान पठाण (वय ५४ )असे मृत तलाठ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशीर खान आपल्या कुटुंबीयांना घेऊन नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आज सकाळी जात होते. यावेळी भारती कॅम्पजवळील वळणावर त्यांची कार (एमएच ३०/२२४६) उलटली. यात नासिर खान यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील चार ते पाच जण जखमी झाले.

दरम्यान, परभणी जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button