पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील पेनूर (छोटे) येथील अंकुश बालाजी लांडे (वय ३४) हा शेतकरी तरुण २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १२. ३० च्या सुमारास घरातून निघून गेला आहे. कुणाला काहीही न सांगता तो निघून गेल्याने त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता मोबाईल बंद लागत आहे. त्याचा नातेवाईक, मित्र, सगेसोयरे यांच्याकडे शोध घेतला असता तो आढळून आला नाही. Parbhani
त्यामुळे नवनाथ बालाजी लांडे यांनी अंकुश बेपत्ता झाल्याची खबर चुडावा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन चुडावा पोलिसांनी एक शोधपत्रिका काढून तपास सुरु केला आहे. परंतु तो अद्याप कुठेही आढळून आलेला नाही. त्यामुळे अंकुश लांडे यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त बनले आहे. अंकुश बालाजी लांडे याचा वर्ण काळासावळा, उंची ६ फूट, सडपातळ बांधा, लांबट चेहरा, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट, पायात चप्पल, मराठी हिंदी बोलीभाषा, शिक्षण ८ वी पर्यंत झाले आहे. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळून आल्यास चुडावा पोलीस ठाण्यातील ९८६०६०८२७८, ९७६५०५९९९५, ९८२२४९७८१४, ९८८१०४८०८५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर यांनी केले आहे.
हेही वाचा