Parbhani-Manmad Railway : परभणी- मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण; इंधन, वेळेची बचत होणार

Parbhani-Manmad Railway : परभणी- मनमाड लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण; इंधन, वेळेची बचत होणार

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड विभागातील परभणी ते मनमाड या २९३ किलोमीटर लोहमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जालन्यापर्यंत विद्युतीकरण मागील वर्षीच पूर्ण झाले होते. आता पुढील टप्प्यातील २७ फेब्रुवारीरोजी जालना-परभणी ट्रायलसह सीआरएस तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळेच आता सिकंदराबाद-शिर्डी एक्सप्रेस परभणी, परळी मार्गे विद्युत इंजिनवर धावणार आहे. काकिनाडा -शिर्डी, विजयवाडा- शिर्डी, औरंगाबाद- तिरूपती, औरंगाबाद -हैद्राबाद या रेल्वे १४ मार्चपासून विद्युत इंजिनवर धावणार आहेत, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या सिंकदराबाद मुख्य शाखेने पत्रकाद्वारे कळविले आहे. Parbhani-Manmad Railway

यापूर्वी सप्टेंबर २०२३ पासून परळी येथून विद्युतीकरणावर धावत होत्या. मात्र, परभणी-मानवतरोड दरम्यान काम बाकी असल्यामुळे विद्युतीकरणाचे इंजिन परळीवरून लावण्यात येत होते. पुढील काही दिवसांत विभागातील सर्वच गाडया हळूहळू विद्युत इंजिनावर धावणार आहेत. प्रमुख्याने हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस, नांदेड-पुणे एक्सप्रेस, आदिलाबाद -मुंबई नंदिग्राम एक्सप्रेस, लिंगमपल्ली-मुंबई सीएसएमटी देवगिरी एक्सप्रेस, नांदेड-मुंबई सीएसएमटी तपोवन, नांदेड-मुंबई सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस या सर्व गाडया हळूहळू विद्युत इंजिनावर नांदेड-परभणी-मनमाड या रेल्वे मार्गावर धावतील. Parbhani-Manmad Railway

तसेच यापूर्वी पूर्णा -अकोला, मुदखेड -पिंपळकुटी, परभणी -परळी यांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. आता नव्याने परभणी-जालना-औरंगाबाद-मनमाड नव्याने मार्गाचा समावेश झाला आहे. तर परभणी- नांदेड अंतिम टप्यात काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

नांदेडमध्ये विद्युत इंजिनचे लोकोशेड

नांदेड येथे विद्युत इंजिनचे लोकोशेड बनविण्यात आले आहे. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. विद्युतीकरणामुळे इंधन बचत व वेगाची मर्यादा राहणार नाही. यामुळे वेळेची बचत होईल. भविष्यात दक्षिण मध्य रेल्वे विभागातील नांदेड विभाग पूर्णपणे डिझेल इंजिनशिवाय चलणार आहे. विभागात सध्या ९८ ते ९९ टक्के विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news