Nanded News : धाराशिव येथील डॉक्टर दाम्पत्य नांदेडमध्ये लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

Nanded News : धाराशिव येथील डॉक्टर दाम्पत्य नांदेडमध्ये लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील डॉक्टर लेन परिसरात असलेल्या एका रक्तपेढीचा तपासणी अहवाल योग्य देण्यासाठी धाराशिव येथील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर महिलेने १० हजार रुपये स्वीकारले. व त्यानंतर त्याच मोबदल्यात त्यांच्या पतीने १ लाख रुपये शुक्रवारी (दि. ८) रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर स्वीकारले. ही लाच स्वीकारताना नांदेडच्या एसीबी पथकाने त्याला अटक केली. या प्रकरणी डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nanded News

डॉ. अश्विनी गोरे (वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय उदगीर, जि. लातुर, अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी, प्रादेशिक रक्त संक्रमण कार्यालय, धाराशिव) आणि पती डॉ. प्रितम तुकाराम राऊत (वय 48, पद – वैदयकीय अधिकारी, अस्थीरोग तज्ञ, शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्णालय, धाराशिव, जि. धाराशिव) हे दोघे क्वॉटर्स क्र. 3, क्लास 1 क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव येथे राहतात. Nanded News

सविस्तर माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे डॉक्टर लेन, नांदेड येथे अर्पण रक्तकेंद्र (रक्तपेढी) आहे. दि. 7 मार्च रोजी यातील आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांनी दुपारी एक वाजण्याचे सुमारास त्यांचे रक्त केंद्राला (रक्तपेढी) भेट देवून तपासणी केली. रक्त केंद्राची (रक्तपेढी) तपासणी झाल्यानंतर जातेवेळी दुपारी साडे चार वाजण्याचे सुमारास त्या तक्रारदार यांना म्हणाल्या की, रक्त केंद्राच्या (रक्तपेढी) तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी १ लाख १० हजार द्यावे लागतील, नाही तर तुमचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल. त्यामुळे भीतीने तक्रारदार यांनी त्यांना सुरूवातीला १० हजार दिले.

दरम्यान, १ लाख रूपये लाच देण्याची तक्रारदार यांची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली.
शुक्रवारी (दि. ८) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांच्या मोबाईलवर पंचासमक्ष कॉल लावला. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन बोडके, पोलीस नाईक राजेश राठोड, खदीर, बालाजी मेकाले, अरशद खान, प्रकाश मामुलवार यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

Back to top button