Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण मसुद्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारला कळवणार : मनोज जरांगे- पाटील | पुढारी

Manoj Jarange-Patil : मराठा आरक्षण मसुद्याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून सरकारला कळवणार : मनोज जरांगे- पाटील

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मराठा आरक्षणाचा मसुदा दुरुस्ती करून आणला आहे. परंतु याबाबत उद्यापर्यंत कायदे तज्ञ व अभ्यासक यांच्याशी चर्चा करून मसुद्याबाबत सरकारला उत्तर कळवणार असल्याचे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी आज (दि.१६)  स्पष्ट केले. Manoj Jarange-Patil

जरांगे यांच्या मुंबई मोर्चाच्या निमित्ताने सरकारची सुरू असलेली पूर्वतयारी याबाबत आ. बच्चू कडू व मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी रिता मेहत्रेवार, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोमाणे यांच्या शिष्टमंडळाने आज (दि.१६) अंतरवालीत जरांगे- पाटील यांची भेट घेतली. सरकार दोन दिवसांत जो अध्यादेश काढणार आहे, त्या अध्यादेशातील काही दुरुस्त्या जरांगे- पाटील यांनी सुचवल्या होत्या. त्या अनुषंगाने त्या मसुद्याचा कच्चा ड्राफ्ट या शिष्टमंडळाने जरांगे -पाटील यांना दाखवला.  Manoj Jarange-Patil

यावर जरांगे- पाटील म्हणाले की, पुरावे सापडले त्यांच्या रक्ताच्या नात्यातील सगेसोयऱ्यांना लाभ देण्यासाठी जीआर काढला असला तरी ५४ लाख नोंदी सापडूनही लाभार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र देत नसतील, तर हा जीआर फक्त कागद म्हणून राहील. मग असला जीआर काढून काही अर्थ होणार नाही. दोन दिवसांत तातडीने प्रमाणपत्र वितरित करून परिवारातील आणि रक्तातील नातवाईकांना प्रमाणपत्र दिले. तर आमचे आंदोलन यशस्वी झाले असे होईल. नाही तर पुन्हा फसवणूक केली. तर मुंबईत आंदोलनावर ठाम असल्याचे जरांगे- पाटील यांनी सांगितले.

जरांगे म्हणाले की, आम्ही की,२० जानेवारीच्या आत कुणबी प्रमाणपत्र सापडलेल्यांना कुणबी विशेष बाब प्रमाणपत्र द्या, अन्यथा राज्य सरकारच्या नवीन जीआरचा काहीही फायदा होणार नाही, संपूर्ण राज्यातील नोंद सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या. २० तारखेच्या आत ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. नोंदी असूनही कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही, जरांगे यांची आ.कडू यांच्याकडे तक्रार केली.

त्यांनी जो मसुदा आणला यावर आमचे अभ्यासक,तज्ञ बोलावून चर्चा करतो.या मसुद्यात काही सुधारणा देखील सांगितल्या आहेत.जर ५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिले तरच या मसुद्याचा फायदा होणार आहे,जर ५४ लाख लोकांना व त्यांच्या नातेवाईकांना २० तारखेच्या आत प्रमाणपत्र द्या तरच आमचा हेतू सफल होईल असे मनोज जरांगे म्हणाले.

जर सरकारने मनावर घेतलं तर १८ तारखेच्या आत ५४ लाख लोकांसह यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देणं शक्य आहे.अर्ज करण्यासाठी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या नावांची यादी ग्रामपंचायत कार्यालयावर लावा असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

राज्यात ५४ लाख नोंदी सापडले म्हणतात परंतु लाभ त्यांना अजूनही देण्यात आला नाही, असा प्रश्न जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी चिवटे यांना विचारला.त्यावर आमदार बच्चु कडु म्हणाले की, लोकांनी मागणी केली नाही त्यामुळे अजून लाभ दिला नाही असे जरांगे म्हणाले.

यावर बोलताना आ.कडू म्हणाले की,मराठवाड्यात ३० हजार नोंदी सापडल्या यापैकी १४ हजार लोकांना प्रमाणपत्र दिले.जो अधिकारी प्रमाणपत्र देणार नाही त्यावर कारवाई केली जाईल.शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या धर्तीवर गावा-गावात कार्यक्रम घेऊन प्रमाणपत्र वाटप करणार.२० तारखेच्या आत गावा-गावात जाऊन ज्याची नोंद सापडली त्याला माहिती देऊ,५४ लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप करणं २० तारखेपर्यत शक्य नाही.अर्जदाराने अर्ज केल्याशिवाय कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही असे आ.कडू म्हणाले.

त्यावर जरांगे पाटील म्हणाले की, लोकांनी आपल्या नोंदी सापडले का नाही ते माहितीच नाही तर लोक अर्ज कसा करतील?दोन महिन्यांपासून मी मागणी करतो. ज्या गावाच्या नोंदी सापडल्या, त्या गावागावात ग्रामपंचायत मध्ये माहिती लावा किंवा दवंडी द्या. पण दिले नाही, यादी ही लावली नाही मुंबई निघाला वर दवंडीचे डफडे वाजायला लागले आहे का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.

नोंदी असूनही प्रमाणपत्र देत नाही, निर्गम उतारा ग्राह्य धरत नाही, आज आम्ही तुम्ही दिलेला मसुदा वाचून पाहू, अभ्यास करून सांगु, त्यावर निर्णय घेऊन उद्या उत्तर देवू, असे जरांगे – पाटील म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button