छ. संभाजीनगर: तोडफोडीच्या भीतीने आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयावरील फलक गायब | पुढारी

छ. संभाजीनगर: तोडफोडीच्या भीतीने आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यालयावरील फलक गायब

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केली. त्यामुळे   पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयावरील नाम फलक काढून कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चेला शहरात उधाण आले आहे.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे अन्नत्याग उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गंगापूर तालुक्यात गावोगावी उपोषण, रास्ता रोको, निदर्शने चालू आहेत.  ३० आक्टोबररोजी मराठा आंदोलकांनी आमदार प्रशांत बंब यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात घुसून तोडफोड केली होती. त्यामुळे गंगापूर वैजापूर रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी मराठा आंदोलकांच्या हल्ल्यात आपले कार्यालय सुरक्षित राहावे, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सतीश चव्हाण, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांचे फोटो असलेला डिजिटल बोर्ड काढून टाकत कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा 

Back to top button