Chh. Sambhajinagar Crime News : नांदेड येथील आंतरराज्य दरोडेखोर जेरबंद; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Chh. Sambhajinagar Crime News : नांदेड येथील आंतरराज्य दरोडेखोर जेरबंद; २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नांदेड पोलिसांकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस असलेल्या दोन कुख्यात वँटेड दरोडेखोरांना गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. मंगळवारी (दि.१०) एका हॉटेलमध्ये आरोपी लपून बसलेले असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पिस्टल, काडतूस तसेच कार आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींवर नांदेडसह कर्नाटकात देखील गुन्हे दाखल आहेत.

नांदेड येथील सराईत गुन्हेगार रबज्योतसिंग ऊर्फ गब्या जसविंदरसिंग तिवाना (वय २३ रा. निदानसिंग कॉलनी, भगतसिंग रोड, नांदेड) आणि अमित शेषराव गोडबोले (वय २३ रा. राजकॉर्नर, सहयोगनगर नांदेड) हे दोघे एन २ भागातील एका हॉटेलमध्ये लपून बसलेले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली.

त्यांच्याकडून दोन पिस्टल, जिवंत काडतूस, जांबिया, कार आदीसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुध्द मुकूंदवाडी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गब्यावर नांदेड येथील वजीराबाद, अर्धापुर, मुखेड, नांदेड ग्रामीण, लिंबगाव, विमानतळ आदी पोलिस ठाण्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अमित गोडबोलेवर नांदेड आणि बिदर पोलीस ठाण्यात दरोडा, पोलिसांच्या अंगावर वाहन टाकत खुनाचा प्रयत्न करणे आदी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहीया, उपायुक्त अपर्णा गिते, एसीपी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पीएसआय विशाल बोडखे, सतिश जाधव, संदिप तायडे, संजयसिंह राजपूत, संदीप राशीनकर, राहुल खरात आणि तात्याराव शिनगारे यांनी केली.

गब्या गँगचा सुत्रधार, लाखोंचे दरोडे टाकून फरार

आरोपी रबज्योतसिंग उफ गब्या याची नांदेड जिल्ह्यात प्रचंड दहशत आहे. त्याची स्वत:ची गब्या नावाने त्याने गँग तयार केली आहे. साथीदारांच्या मदतीने क्लब चालकांकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचे काम ही टोळी करीत होती. वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत ३० लाखांचा दरोडा, मुखेड हद्दीत १७ लाखांचा दरोडा तसेच विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत २५ लाखांचा दरोडा टाकून हे आरोपी फरार झाले होते. नांदेड शहरात गुन्हे केल्यानंतर हे आरोपी आंध्रप्रदेश तसेच कर्नाटक राज्यात जाऊन वास्तव्य करीत होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news