Chh. Sambhajinagar bribery case: बिडकीन पोलीस ठाण्याचे जमादार १० हजारांची लाच घेताना ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात | पुढारी

Chh. Sambhajinagar bribery case: बिडकीन पोलीस ठाण्याचे जमादार १० हजारांची लाच घेताना 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

पैठण, पुढारी वृत्तसेवा: बिडकीन येथील पतसंस्थेच्या मॅनेजरने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र लवकर न्यायालयात दाखल करावे. आणि पतसंस्थेचे पैसे परत मिळवून देण्यासाठी १० हजारांची लाच घेताना बिडकीन पोलीस ठाण्यातील जमादार सतीश प्रल्हादराव बोडले यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.३) दुपारी केली. (Chh. Sambhajinagar bribery case)

याबाबत अधिक माहिती अशी की, बिडकीन परिसरातील एका पतसंस्थेच्या मॅनेजरकडून चुकून इतर खातेदारांच्या नावावर काही रक्कम गेल्याचा प्रकार घडला होता. सदरील व्यक्तीकडून बँकेचे पैसे वसूल करून देण्यासाठी संबंधित मॅनेजरने बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्काळ करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी जमादार सतीश बोडले यांनी तक्रारदार मॅनेजर यांच्याकडे १० हजारांची लाच मागितली होती. (Chh. Sambhajinagar bribery case)

त्यानंतर तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज दुपारी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, अंमलदार भीमराज जीवडे, सुनील पाटील, विनोद आघाव, चांगदेव बागुल यांनी सापळा रचून बिडकीन पोलीस ठाण्याच्या आवारात जमादार बोडले यांना लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

हेही वाचा 

Back to top button