Manoj Jarange- Patil : अंतरवाली सराटीतून ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन मनोज जरांगे-पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर रवाना | पुढारी

Manoj Jarange- Patil : अंतरवाली सराटीतून ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन मनोज जरांगे-पाटील राज्यव्यापी दौऱ्यावर रवाना

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे – पाटील आजपासून (दि.३०) राज्यव्यापी दौऱ्यावर रवाना झाले. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यासह नगर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा व यवतमाळ आदी १३ जिल्ह्यांच्या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन ते २५ वाहनांच्या ताफ्यासह रवाना झाले. (Manoj Jarange- Patil)

हा राज्यव्यापी दौरा १२ दिवसांचा असून दौऱ्यात १३ ‎जिल्ह्यांतील ८७ गावांमध्ये जाऊन‎ जरांगे- पाटील मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी ते ५ हजार किलोमीटरहून‎ अधिक प्रवास करणार आहेत. तसेच या दौऱ्यात जरांगे- पाटील यांच्यासोबत कायम २०० कार्यकर्ते आणि २५ वाहनांचा ताफा सोबत असणार आहे. (Manoj Jarange- Patil)

 

जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या जिल्ह्यातील समाज बांधवांच्या भेटी घेवून चर्चा करणार आहे. तसेच शांततेचे आवाहन करण्यासाठी, समाजाचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दौरा करणार आहे. या दरम्यान प्रत्येकाकडे जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी ठरलेल्या ठिकाणी भेटीसाठी यावे, असेही त्यांनी  (Manoj Jarange-Patil) सांगितले.

१४ ऑक्टोबरला अंतरवालीत मराठा समाजाचा राज्यव्यापी संवाद मेळावा घेण्यात येणार आहे. मोठा कार्यक्रम होणार आहे. यात राज्यभरातील समाज बांधव येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमची भावना व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे.

सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळण्यासाठी एक महिन्याची वेळ मागितली म्हणून वेळ दिली आहे. आता 5 हजार नोंदी मिळाल्या आहेत, मग जीआर काढण्यात अडचण काय? विदर्भातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले, मग आम्हाला का नाही ?, गायकवाड आयोगाच्या अहवालात मराठा आणि कुणबी एकच आहेत. पुरावे सापडले नाही हे सरकारचे कारण ऐकणार नाही. पुरावे नसले म्हणून मराठयांना आरक्षण नाही, असा कोणता कायदा आहे. याआधी कोणत्या समाजाच्या नोंदी बघून त्या समाजाला आरक्षण दिले. सध्या सरकारला यावर बोलणार नाही, सरकारला दिलेला वेळ पूर्ण झाल्यावर बोलू. सरसकट महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेच, लागेल असेही ते म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button