छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार, मुकुंदवाडीत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मराठा क्रांती मोर्चाचा एल्गार, मुकुंदवाडीत सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना येथे मराठा उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचे पडसाद सलग दुसऱ्या दिवशी शहरात उमटले. मुकुंदवाडी भागात मराठा समाजाने बंदची हाक दिली होती. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आंदोलक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत मुख्य जालना रोडवर दाखल झाले.

यावेळी राज्य शासनाची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. रस्त्यावर अंत्ययात्रा मध्यभागी आणत आंदोलकांनी ती पेटवून दिली. यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठाण मांडत रास्ता रोको केला. यावेळी मोठा फौजफाटा पोलिसांनी तैनात केला होता. पोलिसांनी आंदोलक भाऊसाहेब जगताप, संतोष शेंगुळे, अमर जागताप, बाबासाहेब डांगे, कमलाकर जगताप, हनुमान शिंदे यांना ताब्यात घेत मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले व काही वेळात सुटका केली.

हेही वाचा : 

Back to top button